ललित कला प्रबोधीनी - एक नवीन पर्व



कला प्रवासाच्या या 25 वर्षाच्या काळात छंद म्हणून काढलेल्या पहिल्या चित्रापासून ते उच्चकलेच्या पदव्यूत्तर पदवी पर्यंतचा खडतर प्रवास तसेच त्यानंतर कला रोजगार मिळवितांना आलेल्या अनंत अडचणी आणि कलेचे प्रस्तूतीकरण, व्यवसायीक कलावृध्दी यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला. कधी परिस्थीती, कधी समाज, तर कधी संगणक साक्षरता यांच्याशी जुळवाजुळव करुन त्यातून मार्ग काढावा लागला.
जवळजवळ मागच्या 20 वर्षांपासून मी पुण्यात कार्यरत असल्याने येथील कलाक्षेत्रातील घडामोडी, कला उच्चशिक्षण, कला प्रदर्शने, व्याख्याने तसेच या क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील उपलब्ध रोजगाराच्या संधी आणि महत्वाचे म्हणजे आय.टी. क्षेत्रातील आर्टिस्ट, डिझायनर्सच्या संधींबददल, त्यासाठीचे पुरक अभ्यासक्रम आणि कोर्सेस याकरिता आमच्या मित्रमंडळीस सल्ला व मार्गदर्शन करणे तसेच त्यासाठी प्रयत्नही करणे हे माझ्या वैयक्तीक पातळीवर सुरुच होते. त्यातील काही मित्र आज या क्षेत्रात ब-यापैकी स्थिरावले सुध्दा आहेत. परदेशात भारतीय कलेस आणि कलाकारास मानाच स्थान आहे. शिवाय बाजारपेठही आहे. त्याचा लाभ आमच्या कलाकारांना मिळावा यासाठी आपण समविचारी आणि समव्यवसायीक मित्रांनी एकत्र येवून हेच काम सहकाराच्या माध्यमातून मोठया स्तरावर का करु नये असा निष्कर्ष निघला.
त्या करीता आम्ही सर्व कलाप्रेमी आणि कलाकार मंडळींना घेवून कलेसाठी सेवा कार्य करावं याचा उपयोग समाजासाठी व्हावा याच उद्देशाने कलाकारांचे आणि कलारसीकांचे प्रबोधन करण्यासाठी, कलेची, कलेसाठी आणि कलाकारांसाठी वाहून घेतलेल्या ललित कला प्रबोधीनी, या संस्थेची स्थापना केली आहे. 

शैक्षणिक मार्गदर्शन व सल्ला: 
1. शालांत कला, पदवीका आणि उच्च कला शैक्षणिक मार्गदर्शन
2. रोजगार आणि उद्योग शैक्षणिक व सल्ला: 
3. कलाकारांना सरकारी आणि खाजगी नौकरीच्या उपलब्ध संधी तसेच 
4. कला विश्वातील विविध नवनविन तंत्रज्ञानाविशयी सल्ला व व्यवसाय मार्गदर्शन
5. कला प्रकाशन आणि प्रसारण: सर्व वयोगटातील उदयोन्मुख आणि हौषी कलाकारांना आणि त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करणे (प्रदर्शन, प्रात्याक्षीके, व्याख्याने स्पर्धा यांचे आयोजन)
6. कला व्यवसाय मार्गदर्शन: हस्तकला तसेच छंदकला, प्रषिक्षण मार्गदर्शन व सल्ला
7. कला पर्यटन 

पुस्तक प्रकाशन: 
1. कलेविषयी ची विविध पुस्तके प्रकाशित करणे
2. ‘Rock Cut Caves Collection’ या लेणी स्थापत्य कलेविषयी चित्र पुस्तक लवकरच उपलब्ध होणार आहे.
3. ‘Color Harmony’ हे रंग विज्ञानावर आधारीत पुस्तक संपुर्ण रंगीत
4. प्रवास मंदिरांचा भाग 1 - ‘हंपी ते बदामी’ आणि भाग 2 - ‘मांडु ते खजुराहो’


संचालक अध्यक्ष: खेमचंद खैरनार M.F.A. Applied Art

संचालक उपाध्यक्ष: श्री. विशाल खैरनार M.F.A. Applied Art

संचालक सचिव: श्री. रुपेष कुलकर्णी A.T.D., A.M., G.D.Art, B.A.

संचालक: श्रीकांत शिंपी

संचालीका: ऊषा नागपुरकर

सल्लागार: आरती शुळ

*** *** *** *** *** ***
Lalit Kala Prabodhini Regd. No. MH/14559/Dhule/Dt. 24.12.2014 Contact no - 9405854573 7038025036 Pune Office - F2, Mausam Vihar, Opp kotbagi Hospital, Aundh, Pune 7 Dhule Office - 47, Prerana Soc., Opp Panchayat Samiti, Deopur Dhule 5 lalitkalaprabodhini@gmail.com www.lalitkalaprabodhini.Org


----------------------------------------------------------------------------

Join us on Lalit Kala Prabodhini Facebook Group - www.facebook.com/groups/969486226446950

----------------------------------------------------------------------------

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment